संजय राऊतांना काम नसतं तेव्हा ते शेर-गाणी ट्विट करत असतात: देवेंद्र फडणवीस | Devendra Fadanvis |

2021-06-12 0

संजय राऊत यांच्या पत्नीला ईडी कडून नोटीस बजावण्यात आल्यानंतर त्याच्यावर प्रतिक्रिया देताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी "संजय राऊत ट्विट करत असतात त्यांच्यामध्ये खूप प्रतिभा आहे त्यांना अनेक शेर-गाणी पाठ आहेत, त्यांना दुसरे काम नसतं त्यावेळी ते शेर आणि गाणं ट्विट करत असतात त्याच्यावर मी उत्तर कशाला देऊ. मी ईडी प्रवक्ता नाही त्यांनाच विचारा कुणी चांगलं काम केलं तर त्यांना नोटीस मिळत नाही चूक नसेल तर कुणी घाबरण्याचे काम नाही. रामदास आठवले यांचे सगळ्या पक्षात संबंध आहेत त्याबद्दल त्यांना अधिक माहिती असणार मी काही बोलणार नाही. मी गोव्याला माझ्या खाजगी कामासाठी आणि एका बैठकीसाठी जात आहे." असे ते म्हणाले आहेत.

Videos similaires